मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर - किशोरी पेडणेकर यांना विश्वास

0


मुंबई - दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त मुंबई झाल्याचा आनंद होत आहे. अवघ्या मुंबईत गुढी पाडव्याचा जल्लोष साजरा केला जातो आहे. पाडव्यानिमित्त उभारलेली भगवी गुढी आहे. भगवी गुढी उभारून आणि भगवा फडकवून मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर विराजमान होईल असा विश्वास माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षापासून मुंबई निर्बंधांत होती. आता कोरोना आटोक्यात आल्याने निर्बंध हटवण्यात आले आहे. त्यामुळे सणांचा उत्साही सुरु झाला आहे. शनिवारी मुंबईभरात गुढी पाडव्याचा उत्साह जल्लोषात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी काढण्यात आलेल्या शोभायात्रात मोठ्या संख्येने मुंबईकर सहभागी झाले होते. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही गुढी उभारून आनंद व्यक्त केला. यावेळी त्या म्हणाल्या की, उभारण्यात आलेली गुढी भगवी आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. तसेच महापालिकेत शिवसेनेचाच महापौर असेल असे पेडणेकर यांनी म्हटले. कोरोनामुळे मागील दोन वर्ष मुंबई संकटात होती. मात्र पालिका व राज्य सरकारच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. कोरोना आटोक्यात आल्याने मुंबई निर्बंधमुक्त झाली, त्यामुळे पुन्हा आपल्य़ा सणांचा उत्साह सुरु झाला आहे, याचा आनंद झाला आहे, असेही महापौर यांनी म्हटले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)