Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्रीमुंबई - शिवसेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (chief Minister) होणार असून सायंकाळी ७.३० मिनीटांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती भाजपचे नेते देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांना दिली

राज्याला पर्यायी सरकार देण्याची गरज होती. त्यात भाजपा, एकनाथ शिंदेंचा गट आणि १६ अपक्ष यात आहेत. यात आणखी काही जण येत आहेत. ही तत्वांची लढाई आहे. महाराष्ट्राला पर्यायी सरकार देण्याची गरज होती असे फडणवीस म्हणाले. दाऊदशी संबंध असल्याच्या कारणावरुन जेलमध्ये गेलेल्या मंत्र्यांचे मंत्रिपदही काढण्यात आले. राज्यपालांच्या पत्रानंतर कॅबिनेट घ्यायची नसते असे संकेत आहेत. मात्र शेवटच्या क्षणी नामांतराचे निर्णय घेतले. ते आता पुन्हा घ्यावे लागणार आहेत. राजभवनात भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, असे त्यांनी सांगितले. या सरकारच्या मंत्रिमंडळात फडणवीस नसतील अशीही घोषणा करण्यात आली आहे. आज संध्याकाळी साडे सात वाजता एकट्या एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom