Corona - मुंबईत १७२४ नवीन रुग्णांची नोंद, २ रुग्णांचा मृत्यू

JPN NEWS
0

मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारी सोमवारी काहीअंशी घटली होती. मंगळवारी रुग्ण पुन्हा वाढले असून दिवसभरात १७२४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण समाधानकारक आहे. दिवसभरात १२४० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोनाच्या ११०६५ चाचण्या घेण्यात आल्या अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.

मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये सलग वाढणारी रुग्णसंख्या सोमवारी मोठ्या फरकाने घटली होती. मात्र मंगळवारी रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊन १७२४ झाली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १० लाख ८३ हजार ५८९ झाली आहे. तर दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंतची मृतांची संख्या १९ हजार ५७५ वर गेली आहे. तर आतापर्यंत १० लाख ५२ हजार २०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के वर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४५८ दिवसांवर घसरला आहे. मुंबईत सध्या ११ हजार ८१३ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !