तुम्ही या आणि स्वत: सांगा, मी मुख्यमंत्रिपद सोडतो - उद्धव ठाकरे

JPN NEWS
0


मुंबई - राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. शिवसेनेच्या जे नाराज आमदार आहेत त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट येऊन भेटण्याचे आव्हान केले. या माझ्याशी चर्चा करा जर तुम्हाला मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर मी त्या क्षणी राजीनामा देण्यास तयार आहे, असे म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालापासून सुरू झालेल्या शिवसेनेतील बंडखोरीवर आज मुख्यमंत्री प्रथमच समोर आले. करोना झाल्याने मुख्यमंत्र्यांनी दुपारी कॅबिनेटची बैठक ऑनलाइन घेतली होती. त्यानंतर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी संवाद साधला.

मी काही दिवस लोकांना भेटत नव्हते, कारण माझ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. पण त्यानंतर मी सर्वांना भेटत होतो असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जे नाराज आमदार आहेत त्यांना सूरतकिंवा अन्य ठिकाणी जाऊन कशाला बोलता जे काही बोलायचे असेल तर माझ्या समोर येऊन बोला असे आवाहन केले.

जर मी तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर माझ्या समोर या आणि स्वत:हून सांगा. इतक नाही तर जर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून देखील मी नको असेल तर तसे सोडण्यास तयार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आपण राजीनाम्याचे पत्र तयार ठेवल्याचे सांगत आज वर्षाहून मातोश्रीला मुक्काम हलवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !