मराठी पाट्यांसाठी पुन्हा दोन महिन्यांची मुदतवाढ मिळणार?

0


मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील आस्थापना आणि दुकानांवर मराठी पाट्या दर्शनी भागात ठळक अक्षरात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याच्या अंमलबजावणीसाठी जून अखेरीपर्यंतची मुदत होती. पण व्यापारी संघटनांनी कोर्टात याचिका दाखल केल्यामुळे मराठी पाट्यांची अंमलबजावणी रखडली आहे. व्यापारी संघटनांनी केलेल्या मुदतवाढीच्या विनंतीमुळेच महानगरपालिका प्रशासन आता मराठी पाट्यांच्या अंमलबजावणीसाठी आणखी मुदतवाढ देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे दोन महिन्यांची मुदतवाढ पालिका प्रशासनाकडून मिळू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून मराठी पाट्यांच्या अंमलबजावणीसाठी या आधीही मुदतवाढ देण्यात आली होती. पण व्यापारी संघटनांच्या म्हणण्यानुसार मराठी फलक तयार करायला कारागिर मिळत नाहीत. तसेच मटेरिअलही अधिक महाग झाले आहे अशी कारणे व्यापारी संघटनांनी वेळोवेळी झालेल्या बैठकीत पालिकेकडे नोंदवली आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्सनेही याआधीच आपली याचिका न्यायालयात मांडत आपले म्हणणे मांडले आहे. तसेच मुदतवाढ देण्यासाठीचीही मागणी याचिकेत केली आहे.

सध्या मुंबईतील दुकाने, आस्थापनांकडून अवघे ३५ टक्के मराठी पाट्या शहर आणि उपगनरात लावण्यात आल्या आहेत. व्यापारी संघटनांनी कोरोनामुळे व्यवसायांना बसलेला फटका, वाढलेली महागाई तसेच कारागिर उपलब्ध न होणे अशी कारणे व्यापा-यांकडून दिली जात आहे. मुदत वाढीची ही कारणे लक्षात घेता प्रशासनाने ही मुदतवाढीची मागणी सुरुवातीला फेटाळली होती. मात्र संघटनांनी त्यानंतर न्यायालयात धाव घेतल्याने मराठी पाट्यांची अंमलबजावणी रखडली आहे. दरम्यान आता व्यापा-यांची मुदतवाढीची मागणी प्रशासनाकडून मान्य करण्यात येणार असल्याचे समजते. मुदतवाढीचा प्रस्ताव सध्या पालिका प्रशासनाकडून दिला जाणार आहे. येत्या काही दिवसातच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)