
मुंबई - ऑगस्ट २०२२ या मासिक वेतनातून मुंबई महापालिका कामगार - कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वेतन कपातीबाबत (२९ / ८ / २०२२ रोजी) मनपा सामान्य प्रशासन मिलिंद सावंत यांची तत्काळ भेट घेतली. कामगारांचे कपात केलेले वेतेन तत्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे ही मुंबई म्युनसिपल कामगार संघ यांच्या वतीने विनंती करण्यात आली. यावेळी मुंबई म्युनसिपल कामगार संघाचे कार्याध्यक्ष राठोड, सरचिटणीस संजीवन पवार, सह सरचिटणीस दीपक जाधव, कार्यकारी सदस्य आनंत पवार, शहर प्रमुख शैलेश कदम, पूर्व उपनगरे प्रमुख बाबुराव जाधव, चिटणीस हेमचंद्र रामचंद्र काटे आणि महेंद्र सुरेश झनकार यांच्या सह कार्यालयीन कर्मचारी कुमार आकाश सुरेश गायकवाड उपस्थित होते.