नितीन गडकरींनी दिला केंद्र सरकारला घरचा आहेर

Anonymous
0

मुंबई - देशात विकासकामांबाबत दिरंगाई होत आहे. प्रत्यक्षात प्रोजेक्ट आखले जातात. पण ते वेळेत पूर्ण कसे होतील, याकडे लक्ष दिले जात नाही, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला.

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सने आयोजित केलेल्या नॅटकॉन-२०२२ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. विकासकामांमुळे नेहमीच चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या याची मोठी चर्चा सुरू आहे. संसदीय समिती आणि निवडणूक समितीमधून नितीन गडकरी यांचे नाव वगळण्यात आले आणि फडणवीस यांचा निवडणूक समितीत समावेश केला. त्यानंतर प्रथमच गडकरी यांचे वक्तव्य समोर आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. गडकरी यांच्या कामाचे राजकीय वर्तुळात नेहमीच कौतुक होते. मात्र, तरीही भाजपने संसदीय समिती, निवडणूक समितीतून त्यांनाच वगळण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)