Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात गणपती बाप्पाच्या आगमनाला सुरुवातमुंबई - काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सावाची लगबग सुरु झाली आहे. मुंबईत सार्वजनिक मंडळांच्या मंडपात गणपती बाप्पाचे आगमन सुरु झाले आहे. रविवारी उमरखाडीचा राजा, काळाचौकीचा महागणपती, खेतवाडीचा विघ्नहर्ता, परळचा महाराजा, मलबारहिलचा राजा आदींचे ढोल, ताशांच्या गजरात वाजत गाजत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात मंडळांच्या मंडपात आगमन झाले.

कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष गणेशोत्सवावर निर्बंध होते. कोरोना नियंत्रणात असल्याने यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. अनेक मंडळांनी महिनाभरापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. देखावे, सजावट, विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईने मंडप सजले आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर जनजागृतीसाठी अनेक मंडळांनी सामाजिक उपक्रम आखले आहेत. मंडळे यासाठी कामाला लागली आहेत. ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. मात्र त्या आधीच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात गणपती बाप्पाचे आगमन होते. शनिवारपासूनच गणपतीच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईतील १४ हून अधिक मंडळांनी गणपती बाप्पाला मंडपात वाजत गाजत आणले. येत्या पुढील दोन्ही रविवारी बहुतांश गणपतीचे आगमन होणार असून तशी तयारी मंडळांनी केली आहे. दरम्यान गणेशोत्वाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाही सज्ज झाली आहे. गणपती आगमन ते विसर्जनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे. विसर्जन मार्ग, कृत्रिम तलाव, चौपाट्यांवरील सुविधा आदी नियोजन करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मंडपात गणपतीचे आगमन -
- उमरखाडी चा राजा
- मलाबार हिल चा राजा
- काळाचौकीचा महागणपती
- खेतवाडीचा विघ्नहर्ता - रेश्मा ताई
- खैरणीचा राजा
- मुंबादेवी चा गणराज
- शिवललकारचा महाराजा
- ग्रॅटरोडचा राजा
- विलेपार्ले चा गणराज
- अष्टविनायकचा राजा
- कामाठीपुराचा महागणपती
- मुंबईचा महाराजा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom