
मुंबई - गणेशोत्सव २०२२ च्या अनुषंगाने आज (दिनांक २७/०८/२०२२) कालीदास नाटयगृह, पी. के. रोड, मुलुंड (पश्चिम) मुंबई- ८० येथे प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ७, मुलुंड, मुंबई यांनी परिमंडळ -७ अंतर्गत येणारे खासदार, आमदार, माजी नगरसेवक, बी. एम. सी, फायर ब्रिगेड, एम.ई.सी.बी.चे अधिकारी तसेच गणपती मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे. या बैठकीला आमदार पराग शाह, आमदार रमेश कोरगावकर यांच्यासह माजी नगरसेविका रजनी केणी यांनी उपस्थित राहून गणेशोत्सव नियोजनाचा आढावा घेतला.