
मुंबई - महाराष्ट्र राज्यातील ठाकरे-शिंदे सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढं ढकलण्यात आली आहे. आज सोमवारची सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी आता मंगळवारी म्हणजेच २३ ऑगस्टला होणार आहे. रविवारी दुपारपर्यंत हे प्रकरण २२ तारखेसाठी लिस्टेड होतं पण अचानक रात्री बदल करण्यात आला.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे आणि शिंदे गटात शिवसेना कोणाची ? यावरून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. या संदर्भातील सुनावणी आज सोमवार दिनांक २२ रोजी होणार होती. मात्र आता ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याचं समजले. तसेच यासंदर्भात महत्त्वपूर्ण कारणही पुढं आले आहे. सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची होणारी सुनावणी आता आज होणार मंगळवार दिनांक २३ रोजी होणार आहे. या महिन्यात तिसऱ्यांदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. तिसरे न्यायमूर्ती उपस्थित नसल्यामुळं सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.