स्मार्ट कार्ड, मोबाईलवर तिकिट व बसपास उपलब्ध

Anonymous
0

मुंबई - प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबर चलो स्मार्ट कार्ड व मोबाईलवर तिकिट व बस पास उपलब्ध होणार आहे. “चलो” स्मार्टकार्ड आणि मोबाईलच्या माध्यमातून तिकीट व दैनंदिन बसपास उपलब्ध करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

बसेसने प्रवास करणा-या प्रवाशांना प्रवास अंतरावर आधारीत 'सुपर सेव्हर' बसपास उपलब्ध आहेत. तसेच उपक्रमाच्या संपूर्ण बसप्रवर्तनावर अमर्याद प्रवासाची सुविधा असलेले 'मॅजिक' बसपास देखील उपलब्ध करण्यात आलेले आहेत. शिवाय दैनंदिन प्रवासाकरिता अमर्याद प्रवासाची सुविधा असलेल्या सर्वसाधारण बसमार्गांवर ५० रुपये आणि वातानुकूलित बसमार्गांवर ६० रुपयांचा बसपास उपलब्ध करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत हे दोन्ही बसपास रोख पैसे दिल्यावर बस वाहकाकडील ईटीआयएम मधून मिळणार आहे.

१५ ऑगस्ट २०२२ पासून दैनंदिन बसपासचे वितरण “चलो” मोबाईल अँप आणि “चलो " स्मार्टकार्डच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रवाशांनी “चलो” मोबाईल अँपची सुविधा घेऊन त्याद्वारे मोबाईलच्या माध्यमातून दैनंदिन बसपास प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच ज्या प्रवाशांना “ चलो " मोबाईल अॅपच्या माध्यमातून ही सुविधा घ्यावयाची नसेल त्यांना “चलो” स्मार्टकार्डच्या माध्यमातून ही सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.

“चलो” स्मार्टकार्डच्या माध्यमातून दैनंदिन बसपासची सुविधा घेताना 'सुपर सेव्हर' अथवा 'मॅजिक' बसपास कार्यरत असलेल्या स्मार्टकार्डमधून ही सुविधा घेता येणार नाही. मात्र, या बसपासचा कालावधी संपल्यानंतर सदर स्मार्टकार्डमधून दैनंदिन बसपासची सुविधा घेता येईल. तसेच व्हॅलेटची तरतूद असलेल्या “चलो " स्मार्टकार्डमधून दैनंदिन बसपासची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हा दैनंदिन बसपास रात्री १२ वाजेपर्यंत वैध राहील.

उपक्रमाच्या बसगाडयांमधून प्रवास करणा-या प्रवाशांनी दैनंदिन बसपास वितरणातील या बदलाची नोंद घेऊन दैनंदिन प्रवासाकरीता “चलो" स्मार्टकार्डचा वापर करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)