मुंबईत कोरोनाचे ५९२ नवीन रुग्ण

Anonymous
0


मुंबई - मुंबईत सोमवारी दिवसभरात ५९२ नवीन रुग्ण रुग्ण आढळले. यातील २१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ७ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले आहेत. तर दिवसभरात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. २४ तासांत ६२४४ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत पाच दिवसांपूर्वी कोरोनाची रुग्णसंख्या बाराशेवर पोहचली होती. त्यानंतर सलग आठशेवर रुग्णसंख्या नोंद झाली. सोमवारी या आकडेवारीत घट झाली आहे. दिवसभरात ५९२ नवीन रुग्णांची नोंद झाली. रविवारी रुग्णसंख्या ८१८ वर नोंद झाली होती. बरे होणा-या रुग्णांची संख्या समाधानकारक आहे. सोमवारी ५८४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ११ लाख १३ हजार ४९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७.८ टक्केवर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९६६ दिवसांवर आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)