राज्यातील ज्वलंत विषयांवर भीम आर्मीने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यातील ज्वलंत विषयांवर भीम आर्मीने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Share This

मुंबई - राज्यातील मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचारासह विविध ज्वलंत विषयांवर भीम आर्मीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. सदर सर्व विषयांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

मुंबई सह राज्यातील शाळा व महाविद्यालयाबाहेरील पानगुटख्याची दुकाने तसेच ई सिगारेटचे रॅकेट चालविणा-यांविरूध्द कारवाई करावी. मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासंदर्भातील पदोन्नती आरक्षणावर ठोस भूमिका घेऊन हे धोरण त्वरीत लागू करावे दादर रेल्वे स्थानकाला डाॅ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असे नामांतर करावे, राज्यातील मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचारावर पायबंद बसण्यासाठी कडक उपाययोजना आखण्यात याव्यात अशा मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिले .

भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भेटावयास गेलेल्या शिष्टमंडळात मुंबई कार्याध्यक्ष अविनाश गरूड, उपाध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष शशांक कांबळे, जिल्हा अध्यक्ष अमित जगताप व पदाधिका-यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages