शिंदें विरोधात बोलाल तर चुन चुनके, गिन गिनके मारेंगे - संजय गायकवाड

Anonymous
0


बुलढाणा - ‘एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलाल तर चुन चुनके अन् गिन गिनके मारेंगे’अशी धमकी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. शनिवारी बुलढाण्यात शिवसेना आणि शिंदे गटाच्या पदाधिका-यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी ठाकरे गटाच्या पदाधिका- यांना धमकी दिली आहे.

शनिवारी बुलढाण्यात शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिका-यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गटातील काही कार्यकर्ते आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यक्रमस्थळी प्रवेश करत आम्हीच शिवसेना असा दावा करत गोंधळ घातला. यात दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांत भिडले. याघटनेमुळे या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण पसरले होते. या घटनेनंतर गायकवाड यांनी धमकी दिली.

दरम्यान संजय गायकवाड यांनी सांगितलं की, ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि नेते पातळी सोडून बोलत आहेत. पण त्यांना माहिती नाही की शिवसेनेच्या संजय गायकवाडांचे कार्यकर्ते किती भयानक आहेत. ते आम्हाला घरात घुसून मारण्याची धमकी देतात पण ते आता जर शिंदे विरोधात बोलले तर आम्ही त्यांना चुन चुनके आणि गिन गिनके मारेंगे. असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला आहे. काल बुलढाण्यात पदाधिका-यांच्या सत्कार सोहळ्याच्या वेळी झालेल्या हाणामारीमुळे तेथील वातावरण तापले होते. त्याचबरोबर शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता शिगेला पोहोचला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)