सरकारने स्थापनेचा खर्च वसुलीसाठी टेंडर काढली - भाई जगताप

Anonymous
0


मुंबई - मुंबई महानगरपालिकेने एका महिन्यात रस्तेकामासाठी ५,२०० कोटींच्या निविदा काढल्या आहेत. प्रशासक असलेले आयुक्त इतके मोठे निर्णय घेऊ शकत नाहीत. शिंदे व भाजप सरकार स्थापन करण्यासाठी जो खर्च झाला, तो वसूल करण्यासाठी ही टेंडर काढली, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. दरम्यान, या निविदेस स्थगिती द्यावी; अन्यथा हायकोर्टाच्या सीसीआय कमिटीद्वारे चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

गुरुवारी मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रद्रोही असल्याचा आरोपही त्यांनी केला. साधूंना झालेल्या मारहाणीबाबत सरकारने कारवाई करण्याची मागणी जगताप यांनी केली. “मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी रस्तेकामासाठी सुमारे १५०० कोटी रुपयांच्या निविदा काढल्या जातात. त्यानुसार पालिकेने गेल्या पाच वर्षात रस्तेकामासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्या होत्या; मात्र पालिकेने एकाच महिन्यात रस्तेकामासाठी ५२०० कोटी रुपयांच्या चार निविदा काढल्या आहेत. इतक्या मोठ्या निविदा काढण्याचा प्रशासकाला अधिकार नाही. पालिकेच्या स्थायी समिती आणि सभागृहात अशा खर्चाला परवानगी देण्याचा अधिकार आहे. पालिकेत सध्या प्रशासक नियुक्त आहेत. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे ईडी सरकार सत्तेवर येताना जो खर्च केला गेला तो यामधून वसूल केला जात आहे,” असा आरोपही जगताप यांनी केला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)