कांदिवलीत बसला आग, सुदैवाने कोणीही जखमी नाही

0

मुंबई - मुंबईत दिवाळी निमित्त आगीच्या घटना घडत असताना आज कांदिवली येथे एका बेस्टच्या कंत्राटदाराच्या बसला आग लागल्याचे समोर आले आहे. ड्रायव्हर आणि उपस्थित नागरिकांनी आगीवर त्वरित नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली लोखंडवाला सर्कल येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे आज सायंकाळी सहा सव्वा सहाच्या सुमारास बस मार्ग क्रमांक २८८ वर धावणारी बस आली. अचानक ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये आग लागली. आग लागताच ड्रायव्हर आणि बाजूच्या नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन यंत्राच्या सह्यायाने साडे सहाच्या सुमारास आग विजवण्यात आली. ड्रायव्हर आणि उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान ठेवून वेळीच आग विजवल्याने कोणीही जखमी झाले नाही.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)