ट्रॉम्बे येथे बाल्कनीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, दोन जखमी

0

मुंबई - ट्रॉम्बे चित्ताकॅम्प (Trombey Chitah Camp) येथील झोपडपट्टी परिसरात तळ अधिक दोन मजली घराच्या बाल्कनीचा भाग शनिवारी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळून चार वर्षीय मुलाचा मृत्यू (Dead) झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना गोवंडी (Govandi) येथील शताब्दी रुग्णालयात (Shatabadi Hospital) दाखल करण्यात आले आहे. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे डॉ. आंधळे यांनी सांगितले.

ट्रॉम्बे चित्ताकॅम्प, बंधन बँक जवळ, दत्ता नगर झोपडपट्टीत तळ अधिक दोन मजली घराच्या बाल्कनीचा भाग शनिवारी ७ वाजण्याच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत प्रणव अशोक माने (४) या चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर प्रिन्स आशीष कोलजी ( ८) व जाफर मदनलाल (४५) हे दोघे जखमी झाले असून दोघांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)