Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Andheri Bypoll - भाजपकडून माघार, भाजप विरोधात संताप आणि घोषणाबाजी



मुंबई - अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने (Announce Withdraw Candidate From Andheri East Bypoll) केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली. त्यानंतरही अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. भाजपशिवाय, इतर बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये अपक्षांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता अपक्ष आणि नोंदणीकृत नसलेले पक्ष कोणती भूमिका घेणार,  याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याबाबतची विनंती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे मत व्यक्त केले होते. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. भाजप उमेदवार मागे घेणार का, याबाबत पक्षाचे नेतृत्व निर्णय घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

पोटनिवडणुकीतून उमेदवार माघार घेण्याबाबत दादर येथील मुंबई कार्यालयामध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, अमित साटम, राजहंस सिंह, कृपाशंकर सिंह, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्याआधी रविवारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्यासाठी ठाम होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर आज भाजपकडून आज झालेल्या बैठकीत माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या पोटनिवडणुकीत विजयी होतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

भाजप विरोधात संताप, घोषणाबाजी -
पोटनिवडणुकीतील माघारी घोषणेनंतर मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे मुरजी पटेल यांचा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुरजी पटेल यांचे अंधेरी एमआयडीसी परिसरात असलेल्या 'जीवन ज्योत कार्यालया'बाहेर मोठ्या संख्येने भाजप समर्थक कार्यकर्ते जमा झाले आहेत. भाजप नेतृत्वाने मुरजी पटेल माघार घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर पटेल यांच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. पटेल यांच्या कार्यकर्त्यांकडून भाजप आणि शिवसेने विरोधात घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांना संताप अनावर झाल्याने त्यांनी अपशब्दांचा वापर केला. तर, काहींना भावना अनावर झालेल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom