Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा बहुमताने विजयी करा - रामदास आठवले


गुजरात / अहमदाबाद - गुजरात विधानसभेच्या (Gujrat Elections) सर्व 182 जागांवर दलित बहुजन आंबेडकरी जनतेची ताकद आहे. संविधानाला राष्ट्रग्रंथ मानून काम करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नेतृत्व सर्वांना सोबत घेणारे साथ देणारे विकास करणारे आणि सर्वांचा विश्वास जिंकणारे नेतृत्व आहे. ते याच गुजरात राज्यातून येत असल्यामुळे गुजरातच्या सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजपला पूर्ण पाठिंबा दिला आहे. मोदींच्या नेतृत्वावर अतूट विश्वास ठेवून गुजरातच्या विकासासाठी भाजपच्या हाती पुन्हा बहुमताने सत्ता सोपवा (Make BJP win again with majority) असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी गुजरातमधील आंबेडकरी जनतेला दलित बहुजनांना केले आहे. 

अहमदाबाद मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी रामदास आठवले  अहमदाबादमध्ये आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी रिपाइंचे गुजरात प्रदेश अध्यक्ष अशोककुमार भट्टी, रिपाइंचे गुजरात प्रभारी जतीन भुट्टा, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेऊन संविधान गौरवाची चर्चा घडवुन देशासमोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देश घडविण्यात आणि संविधान निर्मिती मधील महत्वपुर्ण योगदानाबद्दल गौरव केला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मुंबईत इंदू मिलची जमीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मिळवून दिली. दिल्लीत 26 अलीपुर रोड येथील संविधान आकारातील भव्य स्मारक, दिल्लीतील 15 जनपथ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, महू येथील भीम जन्म भूमी स्मारक असे पंचतीर्थ विकसित करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभरण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व समाज घटकांना न्याय देणारे काम केले आहे. नरेंद्र मोदी जगात नंबर एकचे नेते ठरलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार दलित बहुजन जनतेसाठी चांगले काम करीत आहे. गुजरातमध्ये ही भाजप सरकारने चांगले काम केले आहे. त्यामुळे गुजरातच्या दलितांनी या विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा बहुमताने विजयी करावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा एक ही उमेदवार निवडणूक रिंगणात नसून सर्व 182 जागांवर भाजपला रिपाइंने संपूर्ण पाठिंबा दिला असल्याचे आठवले यांनी जाहीर केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom