Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईत परदेशातील पोरस काँक्रिटचे रस्ते



मुंबई - मुंबईत मजबूत आणि टीकाऊ रस्त्यांसाठी पालिकेने नव्याने सहा हजार कोटींच्या निविदा मागवल्या आहेत. या कामात महत्त्वाच्या ठिकाणी पाणी मुरणारे परदेशात वापरणारे ‘पोरस’ काँक्रिट वापरण्याची अट असणार आहे. यामुळे अतिवृष्टीत तुंबणार्‍या पाण्यापासून सुटका होणार असून वाहतूक सुरळीत राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुमारे २ हजार किमीचे रस्ते आहेत. हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनवण्याचे धोरण पालिकेने आखले आहे. यामधील सुमारे १ हजार किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णही झाले आहे. तर शिल्लक रस्ते टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटचे बनवण्यात येत आहेत. यामध्ये ४०० कोटींच्या रस्त्यांसाठी पालिकेने ५ हजार ८०० कोटींच्या निविदा मागवल्या होत्या. मात्र या निविदांना कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने ही निविदा प्रक्रिया नव्याने राबवण्यात येत आहे. यासाठी पालिकेने ६०७९ कोटी ५१ लाख ७४ हजार ५०२ कोटींच्या निविदा मागवल्या आहेत. पालिकेने याआधी मागवलेल्या निविदा २०१८ च्या दरांनुसार मागवल्या होत्या. मात्र आता चार वर्षांच्या कालावधीत सिमेंट, लोखंड, स्टील आणि इतर आवश्यक सर्व कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींमुळे नव्या निविदा प्रक्रियेत आता कंत्राटाची रक्कम सुमारे १७ टक्क्यांनी वाढली असल्याची त्यांनी सांगितले.

काय आहे ‘पोरस’ तंत्रज्ञान
पोरस तंत्रज्ञानामध्ये वापरले जाणारे काँक्रिट पाणी शोषून निचरा करणारे असेल. या काँक्रिटमधील छिद्रांमधून पाण्याचा निचरा वेगाने होणार असून हे तंत्रज्ञान फुटपाथमध्येही वापरता येईल. हे पाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या वाहिन्यांमधून ‘यू’ आकाराच्या गटारामधून जलवाहिन्या, ठराविक अंतरावरील छोट्या विहिरींमध्ये निचर्‍यासाठी पाठवता येईल. अतिवृष्टी सुरू असताना रस्त्यावर पाणी तुंबणार नाही.

असा होणार खर्च -
शहर विभाग - १२३३ कोटी ११ लाख १९ हजार ०२१
पूर्व उपनगर - ८४६ कोटी १७ लाख ६१ हजार २९९
पश्चिम उपनगर -
झोन : ३ - १२२३ कोटी ८४ लाख ८३ हजार २३०
- झोन : ४ - १६३१ कोटी १९ लाख १८ हजार ५६४
- झोन : ७ - ११४५ कोटी १८ लाख ९२ हजार ३८८

असे होणार काम -
पश्चिम उपनगर - २५३.६५ किमी
पूर्व उपनगर - ७० किमी
शहर विभाग - ७२ किमी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom