ऑरोफेर इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू, इंजेक्शन देशभरातून परत मागवण्याचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 November 2022

ऑरोफेर इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू, इंजेक्शन देशभरातून परत मागवण्याचे निर्देशमुंबई - चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात इंजेक्शन दिल्यावर रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी उपचारांवर शंका उपस्थित केली आहे. चुकीचे इंजेक्शन दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी थेट अन्न व औषध प्रशासनाविरोधात तक्रार केली. परिणामी अन्न व औषध प्रशासनाने इंजेक्शनची निर्मिती करणा-या एमक्युअर कंपनीला ऑरोफेर एफसीएम इंजेक्शन देशभरातून परत मागवण्याचे निर्देश दिले आहेत. (band on orefar fcm injection)

ऑक्टोबर महिन्यात ५६ वर्षीय माणसाला चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाला उपचारादरम्यान ऑरोफर एफसीएम इंजेक्शन दिले गेले. या इंजेक्शननंतर रुग्णाची प्रकृती बिघडल्याने रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. दोन दिवस अतिदक्षता विभागात उपचारानंतर रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी नातेवाईकांनी अन्न व औषध प्रशासनाविरोधात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने सैफी रुग्णालयातील इंजेक्शनचे नमुने कंपनीला परत मागवण्याचे निर्देश दिले, यासह बाजारातील साठाही परत मागवून घ्या, अशीही सूचना केली. कंपनीने २४ नोव्हेंबरपर्यंत ४६४ इंजेक्शनचे नमुने बाजारातून परत घेतले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी रुग्णालयातील तसेच नवी मुंबई व पुण्यातील वैद्यकीय दुकानातून इंजेक्शनचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या नमुन्यांचा प्रयोगशाळा अहवाल प्रलंबित आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad