मुंबईच्या काही भागात मंगळवारी व बुधवारी पाणी पुरवठा बंद

Anonymous
0

मुंबई - बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत केले जाणार आहे. या कालावधीत के/पूर्व, एच/पूर्व, एच/पश्चिम, पी/दक्षिण, एस, एल आणि एन या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील. तसेच के/पश्चिम परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. काही ठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर आगम वाहिनीवरील गळती असल्याने ती दुरुस्त केली जाणार आहे. येत्या मंगळवारी व बुधवारी हे काम हाती घेतले जाणार आहे. या कालावधीत एल विभाग,  एन विभाग, एस विभाग, के/पूर्व विभाग, ) पी/दक्षिण विभाग, पी/दक्षिण विभाग, एच/पूर्व विभाग, जी/उत्तर विभाग या परिसरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)