Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

एकविसाव्या मजल्यावरून पडून घरकामगार मुलीचा मृत्यू, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी


मुंबई - पवई हिरानंदानी गृह संकुलातील हेरिटेज इमारतीच्या एकविसाव्या मजल्यावरून पडल्याने आम्रपाली मोरे ( वय वर्षे १७ ) या मुलीचा जागीच मृत्यू झाला. (Domestic worker's daughter dies after falling from 21st floor) घरमालकिणीने किचनच्या खिडक्या बाहेरून साफ करायला लावल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जनता दल ( सेक्युलर ) चे राज्य महासचिव रवि भिलाणे यांनी पोलिसांकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य घर कामगार युनियननेही आंदोलनाचा इशारा दिला आहे.
                
१७ जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. आम्रपाली हेरिटेज इमारतीच्या एकविसाव्या मजल्यावरील रवि परब ( रूम नंबर २१०४ ) यांच्याकडे घरकाम करत होती. त्यांच्याच शेजारी आम्रपालीची नातेवाईक कविता मैलागीरही घरकामास आहे. कविता काम आटोपून इमारतीच्या खाली आल्यावर सुरक्षा रक्षकाने तिला ही मुलगी पडल्याचे सांगितले. त्यानंतर पुढील हालचाली सुरू झाल्या. मात्र एव्हढं होऊनही परब कुटुंबातील कोणीही खाली येऊन साधी विचारपूसही केली नसल्याचं सांगितलं.
             
आम्रपालीचा नुकताच साखरपुडा झाला होता. तिच्या मागे वयोवृद्ध आई वडील आणि एक लहान भाऊ आहे. त्यामुळे तिच्या घरच्यांना नुकसानभरपाई मिळावी आणि घर मालकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य घर कामगार युनियनच्या अध्यक्षा मंगला बाविस्कर तसेच ज्ञानेश पाटील, सुनंदा नेवसे, ऍड. चित्रा गोसावी यांनी केली आहे.

पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांनी तपास चालू असून दोन दिवसात याबाबत निर्णय घेऊ असं सांगितलं. पोलीस निरीक्षक स्वाती मायाचार्य या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान सदर प्रकारे गुन्हा दाखल न झाल्यास तिव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा रवी भिलाणे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom