
मुंबई - आरे भास्कर वॉकर क्लबच्या मागणीची दखल घेऊन माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी मुंबई महानगरपालिका आरे भास्कर उद्यानाची वेळ वाढवून देण्यासाठी संबंधिताना निर्देश देण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार आरे भास्कर उद्यान सामान्य नागरिकांसाठी सकाळी 6 ते 12 व सायंकाळी 4 ते 10 या वेळेत खुले राहील. याची सर्व नागरिकांनी याची दखल घ्यावी अशी माहिती प्रिती सातम यांनी दिली आहे.