मुंबई पोलीस दलात कोणीही सिंघम नाही, देवेन भारती यांच्या ट्विटने चर्चा

Anonymous
0

मुंबई - मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी मुंबई पोलीस ही एक टीम आहे, इथे कोणताही सिंघम नाही, असे म्हटले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी मुंबई पोलीस दलात कोणताही मतभेद नसल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. या ट्विटमुळे चर्चा रंगली आहे. (There is no Singham in the Mumbai Police Force)

मुंबई पोलीस दलाचे पहिले विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी काल आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेल्या ट्वीटची चर्चा रंगली आहे. देवेन भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती केली असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष पोलीस आयुक्तपदामुळे मुंबई पोलीस दलात दोन सत्ताकेंद्र असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच देवेन भारती यांनी केलेल्या ट्वीटमुळे आणखी चर्चा रंगली आहे.

मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त केलेले आयपीएस देवेन भारती आज पदभार स्वीकारण्यापूर्वी कायदा व सुवव्यस्था विभागाचे जॉईंट सीपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या अंतर्गत काम करतील. देवेन भारती यांच्या अखत्यारीत आर्थिक गुन्हे आणि इतर काही विभागांचा कार्यभार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)