
सोलापूर - माहेरातून पैसे आणण्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून महिला पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पतीसह चौघांवर सोलापूर येथील माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मोहोळ पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या स्वाती भगतसिंग घोगरे (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. तिचे वडील दत्तात्रय विश्वनाथ अंबुरे राहनाऱ्य समर्थनगर, बाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरे भारत नवनाथ घोंगरे, सासू- मंगल भारत घोगरे, पती भगतसिंग भारत घोगरे, दीर- विजय भारत घोगरे (सर्व रा. शिवाजीनगर, माढा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.