
मुंबई - खार पश्चिम कोळीवाडा येथील गोविंद पाटील नगर मध्ये सकाळी ८.४५ वाजता गॅस गळती होऊन आग लागली. या आगीत ६ जण जखमी झाले आहेत. या जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर रुग्णालयात आय सी यू मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जखमींची नावे -
सखुबाई जयस्वाल ४५ टक्के भाजली
प्रियांका जयस्वाल ५१ टक्के भाजली
निकिता मंडलिक ४५ टक्के भाजली
सुनील जयस्वाल ५० टक्के भाजला
यशा चव्हाण ४० टक्के भाजली
प्रथम जयस्वाल ४५ टक्के भाजला