पालिकेच्या मैदानांवरील "संस्थाने' धोक्‍यात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या मैदानांवरील "संस्थाने' धोक्‍यात

Share This
मुंबई - महापालिकेच्या मैदानांवर उभारण्यात आलेली शिवसेना-भाजपची संस्थाने वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. प्रशासनाने तयार केलेल्या नव्या धोरणात या पक्षांच्या नेत्यांचे क्‍लब आणि जिमखाने बंद होण्याची वेळ आली आहे. हे धोरण गटनेत्यांपुढे सादर करण्यात आले असल्याचे सांगून प्रशासनाने शिवसेनेची हवाच काढून घेतली आहे. अखेर गटनेत्यांच्या बैठकीपर्यंत हे धोरण सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महापालिकेची मैदाने दत्तक देण्याच्या धोरणानुसार शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी मैदाने ताब्यात घेतली आहेत. त्यावर टीका होऊ लागल्यामुळे प्रशासनाने उद्याने आणि मैदाने दत्तक देण्यासाठी नवीन धोरण तयार केले. आता दत्तक योजना रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सामाजिक संघटना व स्थानिकांच्या संघटनांनाच मैदाने काळजीवाहू तत्त्वावर देण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप नेत्यांची संस्थाने खालसा होणार आहेत.
हे नवे धोरण प्रशासनाने मेमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी गटनेत्यांपुढे मांडले होते. मात्र, निवडणुकांचे कारण सांगून ते लांबणीवर टाकण्यात आले. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी बुधवारी गटनेत्यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केल्यावर हे धोरणच सादर झाले नसल्याचा दावा सत्ताधारी पक्षाने केला. हे धोरण सादर झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावर पुन्हा धोरण सादर करा, अशी मागणी शेख यांनी केली. गटनेत्यांच्या पुढील बैठकीत हे धोरण सादर होईल, असे सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी सांगितले. 

नेत्यांची संस्थाने 
- पोयसर जिमखाना, वीर सावरकर मैदान, बोरिवली ः भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांची निकटवर्तीय व्यक्ती
- दहिसर स्पोर्ट फाऊंडेशन ः शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर
- मातोश्री क्‍लब, जोगेश्‍वरी ः आमदार रवींद्र वायकर

-मुंबईत 186 मैदाने दत्तक तत्त्वावर दिली आहेत.
-एक हजार 52 मोकळी मैदाने आहेत.
-700 मैदानांचा विकास झाला आहे.
-160 मैदाने उद्यान विभागाने ताब्यात घेतली आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages