महिला डब्यातील सीसीटीव्ही मार्च २0१६ नंतरच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महिला डब्यातील सीसीटीव्ही मार्च २0१६ नंतरच

Share This
मुंबई : मध्य रेल्वेच्या एका लोकलमधील महिला डब्यात सीसीटिव्ही बसवून त्याची चाचणी घेण्यात येत होती. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. ही चाचणी जरी यशस्वी झाली असली तरी निविदा प्रक्रियेला विलंब होणार असल्याने मार्च २0१६ नंतरच ५0 महिला डब्यात सीसटिव्ही लागणार असल्याचे समोर आले आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील एका लोकलमधील महिला डब्यात सीसीटिव्ही बसवण्यात आले आणि त्याची यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आणखी तीन लोकलमधील नऊ महिला डब्यात सीसीटिव्ही बसवण्याचे काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण करण्यात आले. एकूण १७ लोकलमधील ५0 महिला डब्यात सीसीटिव्ही बसवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्याही दहा लोकलमधील एकूण ५0 महिला डब्यात सीसीटिव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील सीसीटीव्ही असणारी पहिली लोकल ३ आॅक्टोबर २0१५ पासून सेवेत आली. या लोकलमधील महिला डब्यात दहा सीसीटीव्ही बसवण्यात आले असून त्याची चाचणी यशस्वी झाल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेन्द्र पाटील यांनी सांगितले. डब्यांची आणि बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्हींची संख्या ही जास्त असल्यानेच निविदा प्रक्रियेला वेळ लागेल, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages