विकास आराखड्याचा वाद लवकरच मिटणार - सुचना हरकती नोंदविण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विकास आराखड्याचा वाद लवकरच मिटणार - सुचना हरकती नोंदविण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - चुकीची आरक्षणे टाकल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला मुंबईचा "विकास आराखडा 2014-2034' आता सुधारण्यात येत आहे. त्यासाठी आराखड्यासंदर्भात निरीक्षणे नोंदविण्यात येत आहेत. त्यासाठी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत नागरिकांना देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली.

पालिकेच्या विकास आराखड्याने मोठा वाद निर्माण केला होता. चुकीची आरक्षणे टाकल्यामुळे हा विकास आराखडाच चुलीत घालण्याचा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला होता. वाद उफाळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विकास आराखडाच रद्द केल्याची घोषणा केली. मात्र विकास आराखड्याच्या वादामुळे तत्कालिन पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना आयुक्तपदावरून पायउतार व्हावे लागले. विकास आराखड्यातील वादाची दखल घेवून विद्यमान पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी विकास आराखड्याचे सुधारित प्रारुप तयार करण्याचे काम सुरू केले आहे. ज्या ठिकाणी चुकीची आरक्षणे टाकली होती. त्याबाबत संबंधित विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांमार्फत त्या प्रकरणांचा निपटारा करण्याचे काम केले जात असल्याची माहिती पालिका आयुक्त अयोज मेहता यांनी दिली.

पालिकेच्या संबंधित खात्याद्वारे संपूर्ण पालिका क्षेत्राचे सर्वेक्षणकेले आहे. हे सर्वेक्षण पालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. नागरिकांनी त्यांच्या निरीक्षणे येत्या 30 नोव्हेंबरर्पंत नोंदविण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे वादाचे मुद्दे विकास आराखड्यातून दूर होतील असे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले. पालिकेच्या संकेत स्थळावर"प्रारुप विकास आराखडा 20014-34' या संकेत स्थळावर क्‍लिक केल्यास विकास आराखड्याचे पान उघडते. पालिकेच्या चोवीस विभाग कार्यालयातील नामनिर्देशन सर्वेक्षणासंबंधी माहिती पीडीएफ फाईलमध्ये संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलीआहे. नागरिकांची काही निरीक्षणे असल्यास ती येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत कळवावीत असे आवाहन पालिकेने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages