बेस्टच्या होर्डिंगवरील जाहिरातीचा प्रस्ताव परत पाठवला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या होर्डिंगवरील जाहिरातीचा प्रस्ताव परत पाठवला

Share This

मुंबई / प्रतिनिधी 
बेस्टची ठिकठिकाणी होर्डिंग आहेत. या होर्डिंगवर जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी खाजगी संस्थाना कंत्राटे दिली जातात. असाच एक प्रस्ताव जुहु जेवीपीडी येथील होर्डिंगवर जाहिराती प्रदर्शित करण्याचा बेस्ट समिती समोर आला होता. सदर प्रस्तावाला बेस्ट समिती मध्ये हरकत घेतल्यानंतर प्रशासनाकडे परत पाठवले आहे.

जुहु जेविपिडी येथील बेस्टच्या होर्डिंगवर जाहिराती प्रदर्शित करण्याचा प्रस्ताव समितीपुढे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार सिम्बोसीस या कंपनीला दरवर्षी कोणतीही अधिक रक्कम न घेता कंत्राट देण्यात येणार होते. असा प्रस्ताव मंजूर केला असता तर बेस्टला आर्थिक नुकसान झाले असते. यामुले
जेवीपीडी सारख्या उच्छभ्रू लोकांच्या वस्तिमधे होर्डिंग लावताना बेस्टला चांगला महसूल मिळू शकतो. उच्चभ्रू लोकांच्या वस्त्तित जास्त महसूल मिळवायचा सोडून प्रशासनाला सिम्बोयसिस पूळका का आला असा प्रश्न होम्बाळकर यांनी उपस्थित केला.

उच्चभ्रू लोकांच्या वस्तीमधे जास्त महसूल मिळू शकतो यामुले बेस्टची परिस्थिती हालाकिची असताना दरवर्षी 10 टक्के दरवाढ करत प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी होंबाळकर यांनी केली. यावर सत्ताधारी शिवसेनेचे सुनील गणाचार्य  यांनी प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी केली असता गणाचार्य यांच्या मागणीला विरोध करत मनसे आणि कोंग्रेसने विरोध करत प्रस्ताव परत पाठवण्याची मागणी केली. बेस्टचे होणारे नुकसान लक्षात घेवुन बेस्ट समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी प्रस्ताव परत पठावण्याचे निर्देश दिले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages