बेस्ट उपक्रम आता फेसबुक, ट्‌विटरवर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट उपक्रम आता फेसबुक, ट्‌विटरवर

Share This
मुंबई - बसप्रवासी आणि वीज ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी बेस्ट उपक्रम सोशल मीडियाचा वापर करणार आहे. नव्या वर्षात फेसबुक आणि ट्‌विटर अकाऊंट सुरू करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. 

फेसबुक आणि ट्‌विटरच्या माध्यमातून नागरिकांचा प्रतिसाद जाणून घेतला जाईल. या माध्यमांद्वारे बसभाड्याचे सुसूत्रीकरण, विशेष बसमार्ग, नवीन बसमार्ग तसेच वीज विभागाबाबत महत्त्वाची माहिती सोशल मीडियाद्वारे प्रवासी आणि वीजग्राहकांना कळवता येईल. बेस्टच्या संदर्भातील छायाचित्रे, चित्रफिती, महत्त्वाच्या घडामोडी आणि उपक्रमाच्या उद्दिष्टांची माहिती फेसबुकवर अपलोड केली जाईल. फेसबुक आणि ट्‌विटर अकाऊंट हाताळण्यासाठी "डिजिटल पब्लिक रिलेशन्स एजन्सी‘ नेमण्यात आली असून सूचना आणि तक्रारी या एजन्सीमार्फत प्रशासनापर्यंत पोहोचतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages