घुसखोरी प्रकरणी नार्वेकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घुसखोरी प्रकरणी नार्वेकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी

Share This
मुंबई /प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेचे ५५ राजवाडकर स्ट्रीट येथील लायब्ररी आणि उपचार केंद्र होते. या लायब्ररी आणि उपचार केंद्रात १३ ऑक्टोबर २०१४ रोजी घुसखोरी करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेने २४ नोव्हेंबर २०१४ रोजी एफआयआर नोंदवण्यात आला. घूसखोरी करणाऱ्यावर कारवाई झाली असता त्याला जामीन मिळाला आहे. परंतू या प्रकरणी स्थानिक नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणला असल्याचे पालिकेने न्यायालयात सादर केले आहे. स्थानिक नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचे नाव घुसखोरी करणाऱ्यांना पाठीशी घालण्या प्रकरणी न्यायालयात सादर झाले आहे. यामुळे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी मागणी माजी नगरसेवक विनोद शेखर आणि नगरसेविका सुषमा शेखर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेवून केली आहे. मकरंद नार्वेकर यांच्यावर व घुसखोरांवर कारवाई करावी म्हणून विनोद शेखर यांनी पालिकेवर दोन वेळा मोर्चा काढला होता. याप्रकरणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे विनोद शेखर यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages