मेट्रो प्रवाशांना दिलासा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 January 2016

मेट्रो प्रवाशांना दिलासा

मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क /  www.jpnnews.in
मुंबई - मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित भाडेवाढीतून मुंबईकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भाडेवाढीला 11 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. 
मेट्रोच्या वर्सोवा ते घाटकोपर दरम्यानच्या प्रवासभाड्यात रिलायन्स इन्फ्राची संलग्न कंपनी असलेल्या मुंबई मेट्रो वनने वाढ केली आहे. या भाडेवाढीला मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने यापूर्वी भाडेवाढीच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिली होती. त्याविरोधात मेट्रो वनने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयाकडे पाठवले. 

उच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक आणि न्या. सी. व्ही. भंडग यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकेवर अंतिम सुनावणी घेण्याचे संकेत दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नेमक्‍या कोणत्या मुद्यावर (अंतरिम स्थगिती की मूळ याचिका) उच्च न्यायालयाला सुनावणी घेण्यास सांगितले, याबाबत स्पष्टीकरण येणे अपेक्षित असल्याने सुनावणीसाठी अवधी द्यावा, अशी विनंती पक्षकारांनी केली. त्यामुळे खंडपीठाने पुढील सुनावणी 11 फेब्रुवारीला होईल. कॉंग्रेसच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही या याचिकेत बाजू मांडण्यासाठी अर्ज केला आहे.

Post Bottom Ad