Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

येत्या दोन वर्षात 50 टक्के शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग वाढवावा – पंतप्रधानांची अपेक्षा

मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क /  www.jpnnews.in
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरुन चालू वर्षीच्या सोळाव्या मन की बातया कार्यक्रमात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणांवर भेट दिल्या. कार्यक्रमात बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, नुकतीच पिक विमा योजना (प्रधानमंत्री फसल बिमा योजना) सुरु करण्यात आली असून, यामधे कमीत कमी 50 टक्के तरी, शेतकऱ्यांनी आपला सहभाग द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या योजनेची प्रक्रिया नवीन तंत्रज्ञान वापरुन अत्यंत सोपी करण्यात आली असून, हप्ताही फारच किरकोळ आहे.
खादीचे महत्त्व विषद करतांना पंतप्रधान म्हणाले की, 18 लक्ष रोजगाराच्या संधी या क्षेत्रामुळे उपलब्ध झाल्या असून, लाखो लोकांना रोजगार देण्याची क्षमता अजूनही या क्षेत्राची आहे. रेल्वे मंत्रालय, पोलिस, भारतीय नौदल, उत्तराखंडचे टपाल विभाग, तसेच इतर विविध विभागांनी खादीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पाऊले उचलली आहेत.
सरदार पटेलांना स्मरुन पंतप्रधान म्हणाले की, भारताचे स्वातंत्र्य खादीमधे असून, भारतीय नागरिक, अहिंसा हे सुद्धा खादीमधेच आहे. शेतकऱ्यांचे कल्याणही खादीचे करु शकेल आणि आता तर, युवा पिढीच्या आकर्षणाचं केंद्रही खादी आहे.
पंतप्रधानांनी नुकताच चालू झालेल्या स्टार्ट अप इंडिया कार्यक्रमामुळे तरुणांना अगणित संधी मिळणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, स्टार्ट अप इंडिया हे फक्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्राथमिकतेशी मर्यादित नाही. त्यांनी यावेळी सिक्कीमच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या पदवीधारकांनी चालू केलेल्या स्टार्ट अप व्यवसायाचे उदाहरण दिले.
हरियाणा आणि गुजरात राज्यांनी अंमलबजावणी केलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या वेगळ्या संकल्पनेची प्रशंसा केली. या दोन्ही राज्यांनी सर्वाधिक शिक्षित मुलींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण केले आहे. त्यांनी हरियाणाचे त्यांच्या राज्यात लिंग गुणोत्तर दर वाढवण्यासाठी अभिनंदन केले.
विशाखापट्टणम येथे 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफ्याची पाहणी करतांना सांगितले की, या प्रदर्शिनीद्वारे भारत जगभरातील सर्व लष्करी सैन्याचे समन्वय करणार आहे. गुवाहाटी येथे 5 फेब्रुवारीपासून आयोजित केलेल्या साऊथ आशियन गेम्समधे सार्क देशांद्वारे जवळपास हजारो ॲथलेट्स सहभागी होणार आहेत. ही भारतासाठी सुवर्ण संधी आहे की, ज्यामुळे सार्क देशांचे सुदृढ संबंध प्रस्थापित करता येतील.

त्यांनी सांगितले की, आता देशातील जनता मन की बात कार्यक्रम मोबाईलवरही ऐकू शकेल. फक्त त्यांना आवश्यकता आहे की, त्यांनी 8190881908 वर मिस्कॉल द्यावा.  मोदी म्हणाले की, सध्या ही सोय फक्त हिंदी भाषेमधे उपलब्ध असली, तरी लवकरच इतर भारतीय भाषांमधेही मन की बात ऐकू शकता येईल. त्यांनी देशवासियांना विनंती केली की, सर्वांनी दरवर्षी जानेवारीच्या 30 तारखेला सकाळी 11 वाजता देशातील हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटांचे मौन पाळावे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom