अंध, अपंगांसाठी मुंबईचे नगरसेवक बेस्टचे मोफत पास परत करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अंध, अपंगांसाठी मुंबईचे नगरसेवक बेस्टचे मोफत पास परत करणार

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकाना बेस्ट उपक्रमामार्फ़त मोफत पास दिले जातात. बेस्टची आर्थिक परिस्थिती हलाकिची असल्याने अंध व अपंग प्रवाश्यांना मोफत प्रवास करता यावा म्हणून मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी आपले बेस्ट बस पास परत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिली.

मुंबई महापालिकेकडून पालिकेतील 232 नगरसेवकाना बेस्ट बसपास मोफत दिले जातात. सध्या बेस्टची आर्थिक परिस्थिती खराब असून बेस्टवर 4 हजार कोटीचे कर्ज आहे. त्यातच अपंग आणि अंध प्रवाशाना बस मधे मोफत प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी केली जात होती. या मागणीच्या अनुषंगाने गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली असता समित्यांचे अध्यक्ष, गटनेते याना पालिका गाड्या पुरविते ते बसने प्रवासाच करत नाहित. यामुले बसपास परत करावेत असा निर्णय घेण्यात आला आहे. समित्यांचे अध्यक्ष, गटनेते यांच बरोबर शिवसेना पक्षाचे सर्व नगरसेवकही आपले बसपास परत करणार आहेत. अंध व अपंग प्रवाशाना मोफत बस सुविधा देता यावी म्हणून पालिकेने जेंडर बजेट मधून एक कोटी रुपयाची तरतूद केली असल्याचे तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages