ओबीसी आरक्षणावर मराठ्यांचे आक्रमण रोखण्यासाठी कुणबी समाज सज्ज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ओबीसी आरक्षणावर मराठ्यांचे आक्रमण रोखण्यासाठी कुणबी समाज सज्ज

Share This
मुंबई - २ ऑक्टोबर रोजी, कुणबी समाजोन्नती संघ या संस्थेचा ९६ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. या कार्यक्रमात कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणावर मराठ्यांचे आक्रमण रोखण्यासाठी कुणबी समाज सज्ज असल्याचे दर्शविले जाणार आहे. मुंबई व कोकणातील कुणबी समाज, तसेच इतर ओबीसी समाज हा यानिमित्त एकत्र येणार असून ओबीसी चळवळ मजबूत करण्याची रणनीती योजली जाणार आहे. मराठा समाज हा खरच कुणबी आहे का ? हा सर्वाना पडलेला मोठा प्रश्न, याचे उत्तर यानिमित्त मिळेल व आरक्षणाबाबत योग्य भूमिका घेतली जाईल असे कळविण्यात आले आहे.     
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण जरूर मिळावे आमचा त्याला पाठींबा राहील परंतु कुणबी म्हणून ओबीसीत शिरकाव हा कोकणातील कुणबी समाजाला घातक आहे त्याची कारणे कोणती याबाबत खुलासा यानिमित्त होणार आहे. संघाध्यक्ष भूषण बरे, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर हे मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रमा दरम्यान ओबीसी व कुणबी समाजातील अनेक मान्यवर नेते, राजकीय पुढारी तसेच समाज सेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कुणबी संघ हा काही वर्षातच शतक महोत्सवी वर्ष साजरा करणार आहे, तसेच विद्यार्थी वसतिगृह, बेदखल कुळांचा प्रश्न, शिक्षण, रोजगार, वैद्यकीय सुविधा असे अनेक विषय यानिमित्त घेतले जाणार आहेत.

संविधानिक अधिकार व आरक्षणाचे महत्व राजकारणात समाजाची झालेली पिछेहाट याबाबत तरुण वर्ग आक्रमक झालेला आहे. चला..जगण्याची दिशा बदलूया हे घोषवाक्य घेवून समाजातील उच्चशिक्षित तरुण आपले योगदान देत आहेत. पुढील काळात कुणबी ओबीसी समाजाला आपले अधिकार मिळवून देण्यासाठी युवा वर्ग मोलाची भूमिका पार पाडण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे युवाध्यक्ष माधव कांबळे यांनी सांगितले. तसेच समाजातील सर्वांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages