२१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१६ दरम्यान पुरुष नसबंदी पंधरवडय़ाचे आयोजन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१६ दरम्यान पुरुष नसबंदी पंधरवडय़ाचे आयोजन

Share This
लाभार्थ्याला १४५१ रुपये व प्रेरणा देणाऱयाला २०० रुपये उत्तेजनार्थ रक्कम
मुंबई - 21/ 11 / 2016
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१६ या कालावधीत पुरुष नसबंदी पंधरवडय़ाचे आयोजन करण्यात आले आहे.

बिनटाक्याची पुरुष नसबंदी ही सुरक्षित, साधी, कमी वेळेत होणारी शस्त्रक्रीया असून ही शस्त्रक्रीया अंगिय बधिकरण करुन ५ ते १० मिनिटात करण्यात येते. ती बिनटाक्याची आणि कटरहीत आहे. सदर शस्त्रक्रीया ही कोणत्याही गुंतागुंतीशिवाय होते.शस्त्रक्रियेनंतर रुग्ण त्वरीत एका तासात घरी जाऊ शकतो. सदर शस्त्रक्रीयेस पात्र असणाऱया पुरुषांनी या सोप्या पद्धतीचा फायदा घ्यावा आणि जोडीदारापैकी कोणीही संततिप्रतिबंधक साधन वापरण्यासंबंधी काळजी करु नये आणि गर्भधारणा होण्याची भिती न ठेवता वैवाहिक जीवनाचा आनंद घ्यावा. शस्त्रक्रीया करणाऱया लाभार्थ्याला १४५१ रुपये व प्रेरणा देणाऱयाला २०० रुपये उत्तेजनार्थ रक्कम दिल्या जातात. कुटुंबकल्याणासाठी तसेच छोटे आणि सुखी कुटुंबासाठी जास्तीत जास्त पुरुषांनी सहभाग घ्यावा. पुरुष नसंबदी शस्त्रक्रीयेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय, के.ई.एम. नायर. जे.जे. ही मोठी रुग्णालये व वांद्रे (पश्चिम) येथील भाभा रुग्णालय, सांताक्रुझ (पूर्व) येथील डॉ. व्ही. एन. देसाई रुग्णालय, कुपर रुग्णालय, गोरेगांव (पश्चिम) येथील सिद्धार्थ रुग्णालय, मालाड (पूर्व) येथील एम. डब्ल्यू देसाई रुग्णालय व एस. के. पाटील रुग्णालय, कांदिवली (पश्चिम) येथील शताब्दी रुग्णालय, बोरिवली (पश्चिम) येथील भगवती रुग्णालय, कुर्ला (पश्चिम) येथील भाभा रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, चेंबूर येथील मॉ रुग्णालय, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय, बर्वे नगर घाटकोपर येथील संत मुक्ताबाई रुग्णालय, कन्नमवार नगर, विक्रोळी येथील महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय, मुलुंड (पूर्व) येथील मुलुंड सर्वसाधारण रुग्णालय आणि मुलुंड (पश्चिम) येथील एम. टी. अगरवाल रुग्णालय या सर्व उपनगरीय रुग्णालयांशी संपर्क साधावा. पुरुष नसबंदीची सेवा कुटुंब कल्याण केंद्र, तीसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, परेल, मुंबई येथे दररोज सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages