डॉ.बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाचे ‘सह्याद्रीवर’ होणार प्रक्षेपण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाचे ‘सह्याद्रीवर’ होणार प्रक्षेपण

Share This

मुंबई दि. 3 :  महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या सहयोगाने निर्माण केलेल्या   “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या चित्रपटाचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन दिनांक 5 डिसेंबर 2016 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रक्षेपण होणार आहे.

महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहयोगाने चित्रपट विकास महामंडळामार्फत या भव्य  चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ.जब्बार पटेल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 

डॉ.  बाबासाहेब आंबेडकर  या चित्रपटासाठी  संशोधन कार्य  डॉ. य. दि. फडके यांनी केले आहे. सूनी तारापोरवाला, अरुण साधु, दया पवार यांनी लेखन केले आहे. तर संकलन विजय खोचीकर, छायाचित्र दिग्दर्शक अशोक मेहता, संगीत अमर हलदीपूर, वेशभूषा भानू अथ्थया, रंगभूषा विक्रम गायकवाड, कलादिग्दर्शन नितीन देसाई, ध्वनी प्रमोद पुरंदरे, निर्मिती सलागार श्याम बेनेगल, या चित्रपटात प्रमुख भूमिका मम्मूटी, सोनाली कुलकर्णी यांच्यासह मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी, जीवन मेरी, राहूल सोलापूरकर यांच्या भूमिका आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages