महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येणाऱ्या भाविकाना उत्तम सुविधा द्याव्यात - दीपक केसरकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येणाऱ्या भाविकाना उत्तम सुविधा द्याव्यात - दीपक केसरकर

Share This
मुंबई दि. 2 डिसेंबर 2016
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमीवर येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून चांगले काम करावे अशा सूचना वित्तराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या.
आज केसरकर यांनी चैत्यभूमी येथे जाऊन विविध शासकीय यंत्रणांमार्फत करण्यात येणाऱ्या कामाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा ६० वा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर २०१६ रोजी साजरा होत असतांना येथे येणाऱ्या अनुयायांची राहण्याची आणि इतर व्यवस्था, येथील सुरक्षा आणि स्वच्छतेची व्यवस्था, मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतांना आपत्कालीन कक्षाची स्थापना केली जावी असे सांगून केसरकर म्हणाले की, येथे येणाऱ्या भाविकांना आरोग्यविषयक सुविधाही उपलब्ध करून देण्यात याव्यात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी दरवर्षी स्वंयशिस्तीचे एक सुंदर उदाहरण घालून दिले आहे. ती परंपरा यावर्षीही कायम राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages