निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करताना मोदींनी संसदेचे बजेट सांगून टाकले - नवाब मलिक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

०१ जानेवारी २०१७

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करताना मोदींनी संसदेचे बजेट सांगून टाकले - नवाब मलिक

मुंबई - नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. आजच्या भाषणातील साऱ्या घोषणा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्या आहेत. या सगळ्या गोष्टीचे विश्लेषण करता असे वाटते की नोटाबंदीच्या निर्णयावरून सरकारला काय मिळाले? हे पंतप्रधानमंत्री सांगू शकले नाहीत. त्यामुळेच देशभरात येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी संसदेत सादर करायचे बजेट आज देशाला संबोधन करण्याच्या नावाखाली मांडले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मोदींनी आजचे भाषण केले असे वाटत होते, अशी टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
पंतप्रधानांच्या भाषणाचा समाचार घेताना मलिक म्हणाले की, मोठ्या नोटांमुळे देशात महागाई, काळ्याधनात आणि भ्रष्टाचारात वाढ होत होती, असे पंतप्रधान भाषणादरम्यान म्हणाले. जर ५०० व १००० च्या नोटांमुळे देशात महागाई, भ्रष्टाचार, काळेधन वाढत होते, तर मग २००० च्या नोटांमुळे पुन्हा महागाई आणि भ्रष्टाचार वाढणार नाही का? याबाबत पंतप्रधानमंत्री काहीच सांगू शकले नाहीत.

८ नोव्हेंबरला सांगितल्याप्रमाणे कागदाचा तुकडा झालेला पैसा बँकांमध्ये किती जमा झाला याचा कोणताही आकडा आजच्या भाषणात देण्यात आला नाही. पंतप्रधान मोदींनी जो काळ्याधनाचा अंदाज बांधला होता, तो तरी खरा ठरला आहे का ? याचा त्यांनी खुलासा करायला हवा होता.

देशभरातील शेतकऱ्यांच्या कर्जावरील ६० दिवसांचे व्याज माफ केले जाणार, अशीही घोषणा आजच्या भाषणात त्यांनी केली. पण अनेक राज्यात शुन्य व्याजावर शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते, मग पंतप्रधानमंत्री कोणते व्याज माफ करणार आहेत? हे मोदींजींनी स्पष्ट करावे असा सवाल यावेळी मलिक यांनी उपस्थित केला.

देशभरात वाढत असलेल्या बेराजगारीबाबतही मोदींनी मौन बाळगले आहे. बेरोजगारी कशी कमी करणार यावर ते काहीच उपाय सांगत नाहीत. देशात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे, खते विकले गेली आहेत, पिके मोठ्या प्रमाणात आली आहेत... हे सांगताना मोदी आपल्या भाषणात स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत. पण शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आहे. मिनिमम सपोर्ट प्राईजपेक्षा कमी पैसे मिळत आहेत. याबाबतही ते काही खुलासा करत नाहीत, असे मलिक म्हणाले.

तसेच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदींनी घरांची योजना आणली. या योजनेसाठी कोणती बँक गरिबांना कर्ज देणार हे त्यांनी स्पष्ट करावे, जिथे कर्जच मिळणार नाही तर सरकार सबसिडी कुठून देणार. गर्भवती महिलांना सहा हजार देण्याची योजना सांगितली जात आहे. ती योजना महिला व बालविकास खात्यामार्फत या योजना आधीपासूनच चालू होत्या.

Comments

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages