पालिका शाळांमध्ये आता सीबीएसई अभ्यासक्रम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका शाळांमध्ये आता सीबीएसई अभ्यासक्रम

Share This


मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई महापालिका शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम शिकवला जावा अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. 
प्रकाश जावडेकर यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीला तत्त्वतः मान्यता देखील दिली आहे. मुंबईत केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कर्मचारी वसाहतींमध्ये सीबीएसई बोर्डाच्या शाळा आहेत. या सीबीएसई शाळांमधील अभ्यासक्रम मुंबई महापालिका शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई महापालिका शाळांमध्ये मुंबईतील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण दिले जाते. मुंबई महानगरपालिकेत शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम शिकवला गेला तर मुंबईतील हजारो गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल असा विश्वास खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages