कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यासाठी महापालिकेवर शुक्रवारी मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 April 2017

कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यासाठी महापालिकेवर शुक्रवारी मोर्चा

मुंबई (जेपीएन न्यूज) - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात श्रमजीवी कामगार संघटना आक्रमक झाली आहे. किमान वेतन आणि कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने शुक्रवारी ७ एप्रिलला महापालिकेवर धडक देणार आहे. गुरुवारी मुंबईसह इतर महापालिकेतील हजारो कंत्राटी कामगार राणी बाग ते मुंबई महापालिका असा मोर्चा काढणार असल्याची माहिती विवेक पंडित यांनी दिली.

मुंबई महापालिकेत विविध विभागात एनजीओच्या नावाने ठेकेदारांकडून कंत्राटी कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात आहे. गेले सहा दिवस शताब्दी हॉस्पिटलचे कामगार आपले कर्तव्य बजावून सुट्टीच्या वेळेत अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर सत्याग्रह करत धरणे आंदोलन करत आहेत. कंत्राटी कामगारांच्या हक्काचा, घामाचा एकही रुपया कुणालाही खाऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करत श्रमजीवी संघटना मुंबईतील सगळी शक्ती रस्त्यावर उतरवणार असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले.

कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात २४० कंत्राटी कामगार काम करत आहेत. एनजीओ बनवून या कामगारांना स्वच्छता सेवक असे नामकरण करण्यात आले आहे. असे नामकरण करून कामगारांना हक्क देण्यापासून प्रशासन पाल काढत आहे. या कामगारांना अत्यल्प वेतन दिले जाते. या कामगारांना कोणत्याही प्रकारचा विशेष भत्ता, किमान वेतन इतर सवलती दिल्या जात नाहीत. असेच प्रकार इतरही महापालिकांमधून होत आहेत. या सर्व कामगारांना न्याय देण्यासाठी भायखळा राणी बाग ते मुंबई महापालिका मुख्यालय असा मोर्चा काढणार असल्याचे पंडित यांनी सांगितले. 

Post Bottom Ad