जकात नाक्यावरील कर्मचाऱ्यांबाबत ठोस भूमिका घेण्याची कामगार सेनेची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2017

जकात नाक्यावरील कर्मचाऱ्यांबाबत ठोस भूमिका घेण्याची कामगार सेनेची मागणी


मुंबई - ३ जुलै २०१७ - केंद्र शासनाकडून १ जुलै पासून जि एस टी लागू करण्यात आल्यानंतर पालिकेची जकात वसुली बंद झाली आहे. मात्र जकात खात्यातील कर्मचाऱ्यांचे कामाचे नियोजन यासंदर्भातील सुस्पष्टता अद्याप पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही . त्यामुळे जकात खात्यातकामाला असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. ह्या कर्मचाऱ्यांना पालिकेत कशा प्रकारे सामावून घेण्यात येणार आहे, यासंदर्भात नियोजन करण्यासाठी महापौरांनी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्यासह तातडीची बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे .

मुंबई महानगरपालिकेचा जकात महसूल विभाग जी एस टी लागू झाल्यामुळे १ जुलैपासून बंद झाला आहे . यामुळे जकात नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्या खात्यात सामावून घेण्यात येणार आहे याबाबत ठोस भूमिका अद्याप पालिका प्रशासनाने घेतलेली नाही, त्याचबरोबर कर निर्धारण व संकलन खात्यातील अनेक कामगार विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, ह्या कामगारांचा ग्रेड पे सुद्धा कामाच्या जबाबदार्यांप्रमाणे देण्यात आलेला आहे. ह्या अनुषंगाने कर्मचाऱ्याच्या कामाचे निकष निश्चित करण्याबाबत नेमलेल्या समितीने उपरोक्त खात्याचा अहवाल पालिका आयुक्तांकडे सादर केलेला आहे मात्र त्या अहवालाबाबत आयुक्तांकडून अद्याप कोणताही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या सर्व विषयासंदर्भात त्वरित निर्णय होणे अपेक्षित असून ह्या बाबत पालिका आयुक्त अजोय मेहता तसेच अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी व संभंदीत अधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करू आपण आपल्या दालनात तातडीची सभा आयोजित करून हा विषय त्वरित मार्गी लावावा अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे .

Post Bottom Ad