
नगरसेविका शैलजा विजय गिरकर यांच्या 5 वर्षांच्या अथक प्रयत्नाने कांदिवलीमधील सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव नवीन बांधून ऑलिंपिक दर्जाचा बनविण्याच्या कामाचे भूमीपूजन आज खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित आमदार विजय ( भाई ) गिरकर व आमदार मा. योगेश सागर, जिल्हा अध्यक्ष श्रीकांत पांडे, नगरसेविका शैलजा विजय गिरकर, नगरसेवक कमलेश यादव, बाळा तावडे, विद्यार्थी सिंह, शिवकुमार झा, सागर सिंह ठाकूर, लिना देहरकर, प्रियांका मोरे, सुरेखा पाटील, सहा. आयुक्त साहेबराव गायकवाड, माजी नगरसेवक मुकेश मिस्त्री, श्रीकांत कवठणकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. [मुंबई - २३ जुलै २०१७]