
बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने माननिय मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना वृत्तपत्र विक्रेत्यांना स्टाॅल संदर्भात होणार्या त्रासाबद्दल निवेदन देण्यात अाले. बृहन्मुंबई महानगपालिकेच्या परिपत्रक क्र. एमएल/१ सन १९९९-२००० अनुसार, वृत्तपत्र विक्री करणारे अाता ज्या ठीकाणी अापला व्यवसाय करीत अाहेत, त्या जागेवर महानगरपालिकेची अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई करण्यात येऊ नये, असे नमुद केलेले अाहे. असे १९९९-२००० चे परिपत्रक असुनही महापालिकेकडून वृत्तपत्रांना त्रास दिला जातो. यामुळे संघटनेच्या वतीने महापौरांना विनंती करण्यात अाली कि अापण नविन परिपत्रक जारी करावे व वृत्तपत्र विक्रेत्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष संजय चौकेकर, प्रकाश वाणी, जीवन भोसले, भालचंद्र पाटे, प्रकाश गिलबिले व युनुस पटेल हे प्रतिनीधी उपस्थित होते.