पावसात बेपत्ता झालेल्या डॉ. अमरापूरकरांचा मृतदेह सापडला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पावसात बेपत्ता झालेल्या डॉ. अमरापूरकरांचा मृतदेह सापडला

Share This

पालिकेच्या चुकीमुळे जीव गेला - 
मुंबई । जेपीएन न्यूज -
मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बेपत्ता झालेले बॉम्बे रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह आज (गुरुवार) सकाळी वरळी कोळीवाडा समुद्रात सापडला आहे. मंगळवारी दुपारी 4.30 वाजल्यापासून डॉ. अमरापूरकर बेपत्ता होते. पालिकेने पाण्याचा निचरा होण्यासाठी उघडलेल्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. यामुळे पालिकेच्या चुकीमुळे एका प्रसिद्ध डॉक्टरचा जीव गेल्याची सध्या चर्चा सुरु आहे.

बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातले नामांकित गॅस्ट्रो अँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख होती. डॉ. अमरापूरकर मंगळवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारात बॉम्बे हॉस्पिटलमधून प्रभादेवी परिसरातील आपल्या राहत्या घरी जाण्यासाठी निघाले होते. साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी उघड्या ठेवण्यात आलेल्या गटारातून अमरापूरकर वाहून गेल्याची माहिती समोर आली होती.  डॉ. अमरापूरकर बेपत्ता असल्याची तक्रार दादर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. पोलिसांना केवळ त्यांची छत्री सापडली असून त्यांचा शोध घेण्यात येत होता. पाण्याचा निचरा व्हावा म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांनी एल्फिस्टनमधील मॅनहोलचं झाकण काढले होते. मॅनहोलच्या उघड्या झाकणाच्या बाजूला पालिकेचा कोणताही कर्मचारी नव्हता. लोकांच्या माहितीसाठी त्यात फक्त बांबू लावण्यात होता. पाण्याखाली मॅनहोल असल्याचा अंदाज न आल्याने डॉ. अमरापूरकर त्यात पडले. तेव्हापासून त्यांचा शोध घेण्यात येत होता. अखेर गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. दरम्यान पालिकेने दाखवलेल्या बेजबाबदार पणाबाबत संतापाची लाट पसरली आहे. मॅनहोल उघड ठेवताना पालिकेने लोकांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला नको का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages