शताब्दी रुग्णालयातील दुरुस्तीच्या कामामुळे रुग्णांची गैरसोय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शताब्दी रुग्णालयातील दुरुस्तीच्या कामामुळे रुग्णांची गैरसोय

Share This
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात गेल्या काही दिवसापासून दुरुस्तीची कामे सुरु आहेत. दुरुस्तीच्या कामामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णालयाच्या दुरुस्तीपूर्वी पर्यायी व्यवस्था न केल्याने रुग्णांवर आवश्यक उपचार मिळत नाहीत. बेड कमी असल्याने काही रुग्णांना ऍडमिट करून घेतले जात नाही. दुरुस्तीचे कामही धिम्यागतीने सुरू असल्याने येथील रुग्णांचे हाल होत असल्याची तक्रार येथील नागरिकांची आहे.
शताब्दी रुग्णालयात शिवाजी नगर, मानखुर्द वाशीनाका, गव्हाणपाडा चेंबूर कॅम्प आदी परिसरातील रुग्ण उपचारासाठी येतात. येथे वाढत्या लोकसंख्ये मानाने रुग्णालयातील सुविधा अपुऱ्या असल्याच्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत. सुविधा अभावी काही रुग्णांना लांबच्या रुग्णालयात जावे लागते. येथील एनआयसीयुमध्ये 10 बेड असून त्यासाठी एकच व्हेंटिलेटर आहे. सध्या येथील एनआयसीयु बंद आहे. लेबर वार्डची दुरुस्ती सुरु आहे, हे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे रुग्णाना ऍडमिट करून घेणे कठीण जाते आहे. पुरुष वार्डसाठी 40 अधिक मान्सूनचे 15 असे 55 बेड होते. मात्र दुरुस्तीचे काम सुरु असल्याने आता या विभागासाठी पर्यायी केवळ १९ बेड उपलब्ध आहेत. डॉक्टरांसाठी पुरेसे साहित्य उपलब्ध नाही. डायबेटीस रुग्णासाठीची ओपीडीही सध्या बंद आहे. रुग्णालयात औषधांची कमतरता असून मोजकीच औषधे उपलब्ध आहेत. या परिसरात राहणारे बहुतांशी रहिवासी मोलमजुरी करणारे आहेत. त्यामुळे जवळपास असलेल्या या रुग्णालयातील असुविधेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. दरम्यान दुरुस्तीचे काम सुरू असले तरी, पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. आयसीयूसाठी १० बेड असून एक व्हेंटिलेटर आहे. काही महिन्यापूर्वी जीएसटीमुळे औषधांची कमतरता होती. येत्या काही दिवसात औषधांचा पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती शताब्दी रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी राजश्री जाधव यांनी दिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages