चेंबूरमध्ये झाड पडून महिलेचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चेंबूरमध्ये झाड पडून महिलेचा मृत्यू

Share This
मुंबई | प्रतिनिधी - 
मुंबईतील चेंबूरमध्ये झाड अंगावर कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. झाड अंगावर पडून महिलेचा मृत्यू होण्याची चेंबूरमधलीच ही दुसरी घटना आहे. याआधी चेंबूरमधील स्वस्तिक पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ या महिलेचा मृत्यू झाला होता. शारदा घोडेस्वार असं मृत्यू महिलेचं नाव असून त्या ४५ वर्षाच्या होत्या. त्या पांजरापोळ येथील रहिवासी होत्या. गुरुवारी सकाळी 10 ते 10.30 च्या सुमारास कामाला जाण्यासाठी शारदा घोडेस्वार डायमंड गार्डन परिसरातील स्टॉपवर बसची वाट पाहत होत्या. बस थांब्याच्या ठिकाणी असलेल्या बाकड्यावर त्या बसल्या होत्या. मात्र त्याचवेळी अचानक झाड अंगावर पडून शारदा यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शारदा यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शारदा या घरकाम करत होत्या. त्यांच्या घरातील त्या एकमेव कमावत्या होत्या. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, सासू, दोन, मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages