Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पालिकेच्या अर्थसंकल्पात परवडणाऱ्या घरांसाठी निधीची तरतूद केली जाणार


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेचा सन 2018-19 चा अर्थसंकल्प शुक्रवारी (२ फेब्रुवारी) स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात मुंबईकरांना परवडणारी घरे बांधण्यासाठी निधीची खास तरतूद केली जाणार आहे.

मुंबईचा सन २०१४ ते २०३४ या वीस वर्षाचा विकास आराखडा महापालिकेने मंजूर केला आहे. मीठागरांसारख्या नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये विकास आराखड्यात दाखवण्यात आलेल्या आरक्षित जागेवर महापालिका परवडणारी घरे बांधणार आहे. महापालिकेला ही घरे बांधकामाच्या किंमतीत मिळणार असल्याने महापालिकेला ‘झिरो कॉस्ट’मध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ज्यांना घरे नाहीत अशा नागरिकांना ही घरे १४ ते १५ लाखांत उपलब्ध करता येतील. विकास आराखड्याला राज्य सरकारची फेब्रुवारी महिन्यात मंजूरी मिळणार असून त्यांची अंमलबजावणी मार्च पासून केली जाणार आहे.

विकास आराखड्याची अमलबजावणी सुरु झाल्यावर परवडणारी घरे बांधण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय कोस्टलरोड, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, माथाडी भवन, डबेवाला भवन, बेस्टसाठी अनुदान बाबत भरीव तरतूद करतानाच झोपडीधारकांवर कर बसवण्याबाबतही तरतूद करण्यात आल्याचे समजते. मागील वर्षीच्या बजेटमधील अमलबजावणी न झालेल्या योजनांची पूर्तता यंदाच्या बजेटमध्ये केली जाणार असून त्यादृष्टीने तरतूद करण्यात आली आहे. जकात रद्द होऊन जीएसटी लागू झाल्यानंतर पालिकेला सर्वात जास्त मिळणारा महसूल बुडाला आहे. त्यामुळे झोपडपट्यांवर कर लादण्याची शक्यता आहे. महसूल वाढवण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत.

अर्थसंकल्पात या तरतूदी असतील ---
- नाहूर येथे सुपस्पेशालिटी रुग्णालय, गोवंडी येथे शताब्दी रुग्णालयाचा विस्तार
-- प्रमुख जलवाहिन्यांच्या बाजूला सायकल आणि जॉगिंग ट्रॅक
-- अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, नव्या रस्त्यांची बांधणी
-- उपनगरीय रुग्णालयांसाठी टेलिमेडिसिन उपक्रम

अपेक्षित उपक्रम -- 
... नरिमन पॉइंट ते वरळी कोस्टल रोड
... ५०० फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ
... मुलुंड - गोरेगाव जोडरस्ता
... २४ तास पाण्यासाठी गारगाई, पिंजाळ धरणे
... भूमिगत वाहनतळ, नवी मैदाने, उद्याने, तलाव
-- डबेवाला भवन, माथाडी भवन, रोहिदास भवन
-- बेस्टसाठी 790 कोटीची तरतूद
-- जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र
-- जलतरण तलाव
-- शहरात स्वच्छता गृहांची संख्या वाढवणार
-- रेसकोर्सवर थीमपार्कसाठी तरतूद

बजेटमधील ४० टक्के निधी खर्च -
मुंबईकरांना दर्जेदार सेवा-सुविधा देण्यासाठी पालिकेने २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीपैकी ४० टक्के निधी खर्च केला आहे. याशिवाय अनेक कामे प्रगतीपथावर असून यासाठी मार्च अखेरपर्यंत 30 टक्के निधी खर्च केला जाणार आहे. गेल्या काही वर्षांच्या निधीच्या विनियोगाचे प्रमाण पाहता गेल्या वर्षीच्या बजेटमधील पालिकेची कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे.

यावर्षीदेखील ‘वास्वववादी’ अर्थसंकल्प - 
गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ‘वास्वववादी’ अर्थसंकल्प मांडला जाईल. मुंबईकरांना चांगल्या सुविधा लवकरात लवकर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाईल. नवे उपक्रम, विकासकामे, नव्या वास्तू, प्रकल्प मुंबईसाठी सुरू होतील. शिवसेना मुंबईकरांना दिलेली आश्वासने नक्कीच पूर्ण करेल.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom